धम्म चळवळीत पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:55 AM2017-06-28T00:55:41+5:302017-06-28T00:55:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला धार्मिक संस्था दिली.

Take initiative in the Dhamma Movement | धम्म चळवळीत पुढाकार घ्यावा

धम्म चळवळीत पुढाकार घ्यावा

Next

राजरत्न आंबेडकर : भारतीय बौद्ध महासभेचा ६२ वा वर्धापन दिन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला धार्मिक संस्था दिली. या संस्थेत आंबेडकरी जनतेने प्रामाणिकतेने काम करण्याची गरज असून धम्माच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त वरोरा येथील नगरपरिषदेच्या सभागहात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे मुंबईचे आनंद मेश्राम, अस्मिता मेश्राम, प्रा. खांडेकर आदी उपस्थित होते. प्रथम तथागत बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक भारतीय बौध्द महासभेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाऊराव निरंजने यांनी केले. तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड. आदेश अलोणे, अ‍ॅड. राकेश गेडाम, अ‍ॅड. मनोहर पाटील, प्रा. पाटील, जे.के. मेश्राम, विलास टिपले, भास्कर ठमके, हनुमान येसांबरे, रंगारी, राहुल कळसकर, अशोक कळसकर, राजू तांबेकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Take initiative in the Dhamma Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.