इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:59 PM2018-11-19T21:59:23+5:302018-11-19T21:59:38+5:30
आपला इतिहास वास्तुच्या स्वरुपात जिवंत असतो. तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभागासोबत सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते. चंद्रपूर ऐतिहासिक शहर असल्याने यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपला इतिहास वास्तुच्या स्वरुपात जिवंत असतो. तो कायम टिकावा याकरिता पुरातत्व विभागासोबत सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असते. चंद्रपूर ऐतिहासिक शहर असल्याने यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केली.
जागतिक ऐतिहासिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभागाच्या वतीने विविध स्पर्धा व छायाचित्र प्रदर्शन गोंडराजे समाधीस्थळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुरात्वत्व विभागाचे अधीक्षक डॉ. इजहार हाशमी, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, इतिहास अभ्यासक टी टी जुलमे, खालसा स्कूलच्या प्राचार्य पोटदुखे, पुरातत्व विभागाच्या सहाय्यक पुरातत्वविद डॉ शिल्पा जामगडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला हा ५५० वर्ष प्राचीन असून त्याची स्वच्छता मागील ५७० दिवसांपासून सुरु आहे. प्रदर्शनीमध्ये भारतातील, एशिया-पेसिफिकमधील विश्वदाय ऐतिहासिक स्मारक स्थळाविषयी महितीसह छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आलेले आहे. तसेच विदर्भातील ऐतिहासिक स्मारक, शहरातील स्मारकांची महितीसह छायाचित्र, चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची छायाचित्र लावण्यात आली आहेत. यावेळी सहभागी विविध शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागृतीसाठी निबंध, चित्रकला ऐतिहासिक स्मारक ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना भारत पुरातत्व विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या फिल्मचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ संरक्षण सहायक प्रशांत शिंदे, रविंद्र गुरनुले, शाहिद अख्तर, चंद्रकांत भानारकर, नितिन रामटेके, संजय सब्बनवार, अमोल उत्तलवार, राजू कहिलकर, बिमल शहा, प्रवीण उंदिरवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.