मार्ग दिशादर्शक फलकावर दीक्षाभूमीची नोंद घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 01:00 AM2016-07-15T01:00:02+5:302016-07-15T01:00:02+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ आॅक्टोबर १९५६ ला तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही भूमी ‘दीक्षाभूमी’ या नावाने जगप्रसिद्ध पावली. चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक व पवित्र ‘दीक्षाभूमी’ वर देश विदेशातील बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायी दरवर्षी लखोच्या संख्येने श्रद्धाभावाने येतात. त्यामुळे दिशादर्शक फलकावर दिक्षाभूमीची नोंद घ्यावी, अशी मागणी आहे.
महानगरपालिका नियम विधीद्वारे चंद्रपूर शहरातील अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या स्थळांचे दिशा दर्शविणारे मार्ग दिशादर्शक फलके शहराच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेली ऐतिहासिक ‘दीक्षाभूमी’ हे स्थळ नोंदविण्यात आले नाही. हे बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखविणारी बाब आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर व शहरातील बौद्ध बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व २ यांना अॅड. राहुल घोटेकर सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावरून गडप कसे झाले, ही गंभीर बाब शासकीय पातळीवर विचार करणारी आहे. या प्रश्नाकडे चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग १ व २ यांनी जातीने लक्ष देऊन दीक्षाभूमीचे नाव मार्ग दिशादर्शक फलकावर लावण्यासाठी खंभीर भूमिका घ्यावी, अशी मागणी संस्थेचे सहसचिव कुणाल घोटेकर व व्यवस्थापक धर्मपाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अनु दहेगावकर, कुणाल चहारे, स्वप्नील कांबळे, मुनेश्वर गजभिये, सिद्धार्थ पाथर्डे, डॉ. विजया गेडाम, प्रा. व्ही.एम. धडाडे, शिला दहिवले, प्रज्ञा रामटेके, अशोक कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)