ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्यांना घेऊन तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:59+5:302021-05-30T04:22:59+5:30

या रस्त्यावर नेहमीच अपघात हाेत आहेत. पुढे माेठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या ...

Take the problems in Brahmapuri taluka to the tehsildar | ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्यांना घेऊन तहसीलदारांना साकडे

ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्यांना घेऊन तहसीलदारांना साकडे

Next

या रस्त्यावर नेहमीच अपघात हाेत आहेत. पुढे माेठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या १०० किमीच्या रस्ताची त्वरित दुरुस्ती करून रुंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी यावेळी कृती संसाधन समिती ब्रह्मपुरीच्या वतीने यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच आवळगाव तालुका निर्माण करावे, अतिक्रमित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे. बेदखल नोंद रद्द करावी. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील एका सदस्याला वनविभागात नोकरी द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. तहसीलदार सयाम यांना निवेदन देतेवेळी यशवंतराव खोब्रागडे, पद्माकर रामटेके, ॲड. नंदा फुले, स्वप्नील रामटेके, नंदकिशोर धकाते, माेतीलाल देशमुख, अनिल उंदिरवाडे, अरुण सहारे उपस्थित होते.

Web Title: Take the problems in Brahmapuri taluka to the tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.