डॉ.आंबेडकरांचा आदर्श घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:52 PM2018-01-08T22:52:35+5:302018-01-08T22:53:08+5:30

संघर्ष केल्याशिवाय कोणतेही यश प्राप्त होत नाही. आपल्याला जोपर्यंत काटे टोचत नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्यास धजवत नाही.

Take the role of Dr. Ambedkar | डॉ.आंबेडकरांचा आदर्श घ्यावा

डॉ.आंबेडकरांचा आदर्श घ्यावा

Next
ठळक मुद्देमुरलीधर गिरटकर : प्रगतशील शेतकरी व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : संघर्ष केल्याशिवाय कोणतेही यश प्राप्त होत नाही. आपल्याला जोपर्यंत काटे टोचत नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्यास धजवत नाही. तेली समाज शिक्षणात खूप मागे आहे. त्यामुळे युवकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, या मुलमंत्राचा स्वीकार करावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन न्यायमूर्ती मुरलीधरराव गिरटकर यांनी केले.
गडचांदूर येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे रविवारी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामेश पिसे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रा. नामदेवराव वरभे, प्राचार्य हंसा गिरडकर, संयोजक योगेश समरीत, प्रा. रामनंदेश्वर गिरडकर, संचालक विजयराव बावणे, नोगराज मंगरुळकर, ठाणेदार विनोद रोकडे, शोभा घोडे, रामदास गिरडकर, किशोर बावणे, गजानन खामनकर आदी उपस्थित होते.
यावेळी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या फलकाचे अनावरण न्यायमूर्ती गिरटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विदर्भ समाज महासंघाच्या वतीने न्यायमूर्ती गिरटकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी संभाजी रागीट, पुंजाराम हिवरे, पुंडलिक मंगरुळकर, ज्येष्ठ नागरिक सज्जन वैरागडे, श्रावण इटनकर, गोपाळराव राजूरकर, बापूराव इटनकर, रमेश बोंदरे, नानाजी इटनकर, मारोती इटनकर, प्रगतशील व्यापारी नामदेवराव येरणे, किशोर बांगडे, मंगला वैरागडे, प्रभाकर वैरागडे, रामचंद्र पोटदुखे, संजय खणके, अनिल नागपुरे, उपसरपंच उमेश राजूरकर, गिरजाबाई गोबाडे, अक्षय मंगरुळकर, सुमित वैरागडे, पल्लवी बावणे यांचा सत्कार करण्यात आला.
संचालन प्रा डॉ. राजेश गायधनी, प्रास्ताविक बंडू वैरागडे तर उपस्थिताचे आभार अशोक बावणे यांनी मानले. यावेळी हेमांत वैरागडे, शंकर नागपुरे, विक्रम येरणे, तुषार कलोडे, नरेश शेंडे, राजीव तुडे, सुनील वैरागडे, जनार्धन घटे, बंडू रागीट, नरेश वैरागडे तसेच विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Take the role of Dr. Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.