साथीच्या आजाराबाबत उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:20 PM2018-08-26T23:20:33+5:302018-08-26T23:20:47+5:30

शहरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्याचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येत आहे. या संदर्भात गुरुवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत चर्चा करण्यात आली.

Take the solution for pandemic illness | साथीच्या आजाराबाबत उपाययोजना करा

साथीच्या आजाराबाबत उपाययोजना करा

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल पावडे : स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्याचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होताना दिसून येत आहे. या संदर्भात गुरुवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत चर्चा करण्यात आली. संततधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये दूषित पाणी जमा झाले असून त्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होऊ रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यावर अंकुश लावण्याकरिता तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना सभापती राहुल पावडे यांनी केल्या.
उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने किटकनाशकांचा वापर, नेहमी फॉगींग करणे तसेच रस्त्यांवरील लहान लहान खड्डे तात्काळ बुजवण्यिात यावे. याकरिता लक्षपूर्वक कार्य करुन चंद्रपूर शहर डेंग्यूमुक्त करण्याकरिता अधिकाºयांनी व प्रशासनाने सज्ज राहावे. तसेच आरोग्य विभागाच्या टिमच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांची तपासणी करण्यात यावी. अशा सूचना सभापती राहुल पावडे यांनी स्वच्छता व संबंधित विभागास केल्या. त्याचप्रमाणे संततधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झालेले आहेत. त्यामध्ये विशेषत: बस स्टॉप रोड ते बंगाली कॅम्प ते एमईएल रोड हा रस्ता महामार्गा असून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील असला तरी मनपाने आपले कर्तव्य समजून सदर रस्त्यावर मुरुम, गिट्टी टाकून रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्यिात यावे आणि रस्त्यांवर नागरिकांना आवागमन करताना धूळ व मातीचा नाहक त्रास होऊ नये याकरिता नेहमी रस्त्यांची सफाई करण्यात यावी व रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी. तसेच शहरात अमृत योजनेचे कार्य जोमाने सुरु असून पाईपलाईन टाकण्याकरिता रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले असून त्याची लेव्हल करण्यात यावी, असेही पावडे यांनी सांगितले.

Web Title: Take the solution for pandemic illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.