‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:28 PM2018-09-16T22:28:23+5:302018-09-16T22:28:40+5:30

शहरातील बाबुपेठ येथील स्नेहदीप बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया बंडू कुत्तरमारे या नराधमास कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, तसेच राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, अशी मागणी प्रहार अनाथ संघठन तथा आमदार बच्चू कडू युवा विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Take stringent action against those 'accused' | ‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा

‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बच्चू कडू युवा विचार मंचची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ येथील स्नेहदीप बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया बंडू कुत्तरमारे या नराधमास कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, तसेच राज्यातील बालगृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, अशी मागणी प्रहार अनाथ संघठन तथा आमदार बच्चू कडू युवा विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
चंद्रपुरातील स्नेहदीप बालगृहातील अल्पवयीन मुलीवर तेथील काळजीवाहक बंडू कुत्तरमारे यांने बलात्कार केल्याची घटना ५ आॅगस्ट बालकल्याण समितीतर्फे बालगृहाची तपासणी करताना उघडकीस आली. त्यावरून रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावा, तसेच बालगृहातील मुलींच्या सुरक्षीततेची जबादारी असणाºया अधीक्षक, संचालक मंडळ, संबंधित प्रशासकीय अधिकाºयांना सहआरोपी ठरवून त्यांच्यावर कारवाही करावी, राज्यातील सर्व बालगृह, अनाथालय, वसतिगृह यातील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी, जिल्हा पातळीवर शासकीय व निमशासीय, अनाथ संघटनेचे सदस्य घेऊन समितीची स्थापन करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी अमित वासनिक, प्रशांत कारेकर, संजय तोंगटीवार, अजय बोंदगूलवार, संदीप झाडे, निलेश ढवस, नितीन नागरकर, गणेश उराडे, राहुल चौधरी, आशीतोष सातपूते, प्रशांत आडे उपस्थित होते.

Web Title: Take stringent action against those 'accused'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.