‘त्या’ मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:17 AM2018-04-18T01:17:27+5:302018-04-18T01:17:27+5:30
कठुआ व उन्नत येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीआरएसपीतर्फे जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातपर्यंत रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कठुआ व उन्नत येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीआरएसपीतर्फे जिल्हाध्यक्ष मोनल भडके यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यातपर्यंत रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा भाजपा सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र भाजपांकडून कठुआ अत्याचार प्रकरणातील दोषींच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येत आहे. तर उन्नव येथील अत्याचारातील दोषींवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाजप सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला.
तसेच अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, कमल तुरे, सुनीता दुपारे, संगीता बनकर, किरण वानखेडे, भूमिका घोनमोडे, प्रिया रामटेके, स्मिता मानकर, शाहिस्ता खान, विशाल रंगारी, चंद्रकांत माझी, भारत भांदककर, महेंद्र झाडे, अशोक बनकर, अशोक रामटेके आदी उपस्थित होते.
घुग्घुस येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रम
घुग्घुस : काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वात सोमवारी सांयकाळी येथील काँग्रेस कार्यालयात श्रध्दांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी अत्याचार प्रकरकणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान मेनबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी इंटक नेते लक्ष्मण सादलावार, माजी जि.प. सदस्य जयंता जोगी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शोभा ठाकरे, माजी ग्रा.पं. सदस्य ममता खैरे, पं. स. माजी उपसभापती रती जयस्वाल, मुन्नाभाई लोहानी, कामगार नेता सैय्यद अनवर, गणेश उईके, उत्तम ठाकरे, प्रभाकर कत्रोजवार, अशपाक शेख, पवन नागपुरे, शेख शमीउद्दीन, मिस्बाहुल हक, जाफर शेख, निरीक्षण कोंदे, अंकुश सपाटे, अंकेश मडावी, महेंद्र बाग, रंजीत राखुंडे, आशा आवळे, वैशाली वेल्हे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.