वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या -किशोर जोरगेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:19 AM2017-09-18T00:19:22+5:302017-09-18T00:19:36+5:30
वेकोलिचे मुख्य प्रबंधक यांना किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे इरफान शेख, संतोष दिकोंडवार, इम्रान खान, विनोद अनंतवार यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिचे मुख्य प्रबंधक यांना किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे इरफान शेख, संतोष दिकोंडवार, इम्रान खान, विनोद अनंतवार यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वेकोलिच्या चंद्रपूर येथे २२५, बल्लारपूर १२५, सास्ती १५०, वणी २८० आणि प्रतीक्षा यादीमध्ये २५० सुरक्षा रक्षक आहेत. साधारणत: ३ महिन्यापासून या सुरक्षा रक्षकांना काम नाही. २ दिवसापूर्वी घुगुस येथील ५५ वर्षीय फ्रांसिस एंथोनी एंड्री या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली तसेच कुटुंबाची जबाबदारी असलेल्या पुन्हा एका सुरक्षा रक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न किशोर जोरगेवार यांनी केला आहे.
वणीचे मुख्य प्रबंधक मजुमदार यांना निवेदन देवून कित्येक वर्षांपासून वणी नार्थ, वणी, चंद्रपूर, सास्ती, बल्लारपूर, माजरी या एरिया मध्ये जवळपास १००० ते १२०० सुरक्षा रक्षक कार्यरत होते. वेकोलिने खाजगी कंत्राट रद्द केल्याने याचा मोठा फटका सुरक्षा रक्षक यांना फ टका बसला आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सुरक्षा रक्षक यांची आर्थिक, मानसिक परिस्तिथी लक्षात घेता त्यांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण सुरक्षा रक्षकांशी चर्चा केली तसेच मुख्य प्रबंधक मुजुमदार यांना निवेदन देवून चर्चा केली.
तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या समस्यांवर सात दिवसात तोडगा काढून त्यांना कामावर रूजू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य प्रबंधक यांनी उपस्थितांना दिले.
मागण्यांची पुर्तता करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
पण मुख्य प्रबंधक यांनी फोन करून आंदोलन थांबवा, अशी विनंती केली. मात्र मागण्या न सोडविल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.