सीएम चषक स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडू पुढे येतील - अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:53 PM2019-01-28T22:53:35+5:302019-01-28T22:53:53+5:30
मैदानी खेळ हे मानवी आरोग्याला फायदेशीर आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मैदानी खेळ व व्यायामाची सर्वांना गरज आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना संधी मिळावी, याकरिता सीएम चषक घेण्यात आले. यातून भविष्यात महाराष्ट्र व देशाला प्रतिभावंत खेळाडू पुढे येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मैदानी खेळ हे मानवी आरोग्याला फायदेशीर आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मैदानी खेळ व व्यायामाची सर्वांना गरज आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना संधी मिळावी, याकरिता सीएम चषक घेण्यात आले. यातून भविष्यात महाराष्ट्र व देशाला प्रतिभावंत खेळाडू पुढे येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
राजुरा येथील सम्राट हॉल येथे बक्षीस वितरण सोहळा व मकरसंक्रात महिला स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी आमदार अॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, गोंडपिपरी पं.स. सभापती दीपक सातपुते, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, अरूण मस्की, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, वैष्णवी बोडलावार, नगरसेविका उज्वला जयपुरकर, प्रिती रेकलवार, नगरसेवक राधेश्याम अडाणीया, अश्विन कुसनाके, पं.स. सदस्य सुनंदा डोंगे, भूमी पिपरे, संजय मुसळे, राजु घरोटे, सतीश धोटे, बादल बेले, केशव गिरमाजी, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सीएम चषक समन्वयक आशिष लोनगाडगे, सतीश दांडगे, रेखा देषपांडे, माणिक उपलंचीवार, दिलीप वांढरे आदींची उपस्थिती होती.
ना. अहीर म्हणाले, ग्रामीण क्षेत्रातील सर्व खेळाडूंना समान संधी मिळावी, यासाठी सरकार योजना राबवित आहे. महिला अत्याचार थांबविण्यासाठी कायद्यात सुुधारणा करण्यात येत असल्याचेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.