गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे ठरतेय जीवघेणे; अपघातांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:35+5:302021-07-29T04:28:35+5:30

वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण बेपर्वा वाहन चालवितात. त्यातच खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या घटनेत वाढ ...

Talking on a mobile while driving is fatal; The number of accidents increased | गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे ठरतेय जीवघेणे; अपघातांचे प्रमाण वाढले

गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे ठरतेय जीवघेणे; अपघातांचे प्रमाण वाढले

Next

वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण बेपर्वा वाहन चालवितात. त्यातच खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण मोबाईलवर बोलत सुसाट वाहन पळवितात. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. यात अनेकांचा जीव गेला असून कायमचे अंपगत्वही आले आहे. मात्र, तरीसुद्धा युवक वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळत नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना

मद्य प्राशन करून वाहन चालवित असणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात येतो. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने ब्रेथ ॲनालायरझरचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाया बंद झाल्या आहेत. त्यातच जिल्ह्यात दारूविक्री सुरूझाली आहे. त्यामुळे अनेकजण मद्य प्राशन करूनवाहन चालविताना आढळून येतात.

बॉक्स

हेल्मेट नसल्याने गेला जीव

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे असतानाही अनेकजण याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अनेकदा हेल्मेटअभावी डोक्याला जबर मार लागून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यात काही दिवस महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा बिनदिक्कत विना हेल्मेट प्रवास करताना दुचाकीचालक दिसून येत आहेत.

बॉक्स

जिल्ह्यात घडलेले अपघात

सन २०१७

अपघात ६७४

जखमी ६१३

मृत्यू ३२४

------

सन २०१८

अपघात ६२९

जखमी २९७

मृत्यू ५५४

------

सन २०१९

अपघात ६०७

जखमी ४९८

मृत्यू २६७

-----

सन २०२०

अपघात ५६५

जखमी २४४

मृत्यू ४१०

Web Title: Talking on a mobile while driving is fatal; The number of accidents increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.