तळोधी बा. येथे कोविड चाचणी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:51+5:302021-05-15T04:26:51+5:30
नागपूरच्या खाजगी लँबद्वारे या केंद्रात रोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरटीपीसीआर चाचणी नि:शुल्क चाचणी होणार आहे. ...
नागपूरच्या खाजगी लँबद्वारे या केंद्रात रोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरटीपीसीआर चाचणी नि:शुल्क चाचणी होणार आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी चाचणी अहवाल प्राप्त होणार आहे.
शुक्रवारी येथील जि. प. कन्या शाळेच्या इमारतीत या चाचणी केंद्राचे उद्घाटन सरपंच छाया मदनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जि. प. सदस्य खोजराम मरसकोल्हे व संजय गजपुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, डॉ. जयदीप राठोड, उपसरपंच राजेश घिये, ग्रा. पं. सदस्य नरेश खोब्रागडे, विलास लांजेवार, विवेक सयाम, सोनु नंदनवार, डोणुजी पाकमोडे, भोला कटारे, महेश काशीवार व मोनिल देशमुख उपस्थित होते.
परिसरातील कोविद रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागभीड तालुका आरोग्य विभागातर्फे याच केंद्रावर रॅपीड ॲन्टिजन टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे. सकारात्मक चाचणी आलेल्या कोविड रुग्णांसाठी स्थानिक लोक विद्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने व डॉ. जयदीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे.