तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:01:16+5:30
मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे मुख्य तहसीलमधून काही गावांचा भार कमी व्हावा, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती मोठा गाजावाजा करून करण्यात आली. अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली. मात्र अल्पावधीतच त्यांची बदली झाली. दरम्यान, काही दिवस नायब तहसीलदार यांच्या भरोशावर कारभार चालला. मात्र अलिकडे या ठिकाणी अधिकारीच राहत नसल्याने हे अप्पर कार्यालय वाºयावर सोडले आहे. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.
परिसरातील नागरिकांचे कामे सदर कार्यालयात तातडीने व्हावे, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सहा महिन्यातच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.
परिसरातील नागरिकांसाठी नागभीड हे अंतर दूर असल्याने जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नागरिक व विद्यार्थ्यांची कामे इत्यादींसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
छोटा मोठ्या कामासाठी नागभीड तहसील कार्यालयामध्येच जावे लागत आहे. तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय हे रामभरोसे असल्याने पुन्हा मुख्य तहसील कार्यालयावरच ४० गावांचा भार आलेला आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी नवीन तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.
परिसरातील ४० गावांच्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सदर अप्पर तहसील कार्यालयात अतिरिक्त तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात यावी व कारभार सुरळीत करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी