तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By admin | Published: September 20, 2015 01:29 AM2015-09-20T01:29:40+5:302015-09-20T01:29:40+5:30

शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सत्र २०१५-१६ मधील शालेय पावसाळी क्रीडा स्पर्र्धा ...

Taluka level sports competition at Talodi (BA) | तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

Next

तळोधी(बा) : शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सत्र २०१५-१६ मधील शालेय पावसाळी क्रीडा स्पर्र्धा नुकत्याच तळोधी(बा) येथील लोकविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या.
सदर क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील १४, १७ व १९ वर्षीय मुला-मुलींच्या संघानी खोखो, व्हॉलीबॉल व कबड्डी या खेळात उत्स्फुर्तपणे मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला होता. सदर पावसाळी क्रीडा स्पर्धामध्ये व्हॉलीबॉल या खेळ प्रकारात १४ वर्षीय (मुले) वयोगटातून सरस्वती विद्यालय कोजबी हा संघ विजयी तर टिष्ट्वंकल इंग्लिश स्कूल नागभीड उपविजयी, १७ वर्षीय वयोगट (मुले) यामध्ये सरस्वती विद्यालय कोजबी विजयी तर म.फुले विद्यालय तळोधी(बा) उपविजयी आणि १९ वर्षीय (मुलाचा) गटात म.फुले विद्यालय तळोधी(बा) चा संघ विजयी ठरला.
कबड्डी या खेळ प्रकारात १४ वर्षीय (मुले) यामध्ये लोक विद्यालय सावरगाव विजयी तर अरुण झाडे विद्यालय नांदेड उपविजयी, मुलींच्या स्पर्धेत सावित्रीबाई फुुले विद्यालय गिरगाव विजयी तर महात्मा फुले विद्यालय तळोधी उपविजयी, १७ वर्षीय वयोगटात मुलांमध्ये समाजसेवा विद्यालय वाढोणा विजयी तर सरस्वती विद्यालय कोजबी उपविजयी, मुलींमध्ये महात्मा फुले विद्यालय तळोधी विजयी तर समाजसेवा विद्यालय वाढोणा उपविजयी, १९ वर्षीय वयोगटात मुलांमुलीमध्ये महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय तळोधी विजयी तर यादवराव पोशट्टीवार कनिष्ठ महाविद्यालय तळोधी उपविजयी ठरली आहे. (वार्ताहर)

Web Title: Taluka level sports competition at Talodi (BA)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.