‘तंमुस’ने लावले प्रेमीयुगुलाचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:26+5:302021-07-25T04:23:26+5:30
पळसगाव (पिपर्डा ) : चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता एका ...
पळसगाव (पिपर्डा ) : चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता एका आंतरजातीय प्रेमीयुगुलाचा विवाह विहीरगाव येथील तुकडोजी महाराजांच्या मंदिराच्या आवारात लावून दिला.
राकेश रामचंद्र शेरकी (२७, रा. मदनापूर) व आंचल दिलीप नन्नावरे (२२, रा. विहीरगाव) असे या नवदांपत्याची नावे आहेत. राकेश व आंचल यांचे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते, दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. मात्र कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनीही विहीरगाव येथील तंटामुक्त समितीकडे धाव घेऊन लग्न लावून देण्यासाठी अर्ज केला. समितीने दोघांचीही पूर्ण माहिती तपासून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हिंदू रीतरिवाजानुसार लग्न लावून दिले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रहेमान पठाण, परशराम नन्नावरे, शीतल मुंढरे, विकास बारेकर, मोरेश्वर दुमरे, मधुकर दांडेकर, कवडू नन्नावरे उपस्थित होते.
240721\img-20210724-wa0063.jpg
आंतरजातीय लग्नच्या वेळी उपस्थित तमुस समिती पदाधिकारी