तान्हा पोळा यंदा नाहीच, चिमुकल्याच्या उत्सवावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:06+5:302021-09-07T04:34:06+5:30

काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचे ऋण फेडण्यासाठी पोळा सणाकडे बघितले जाते. त्यामुळे गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. अशा ...

Tanha Pola is not only this year, Virajana on Chimukalya festival | तान्हा पोळा यंदा नाहीच, चिमुकल्याच्या उत्सवावर विरजण

तान्हा पोळा यंदा नाहीच, चिमुकल्याच्या उत्सवावर विरजण

googlenewsNext

काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचे ऋण फेडण्यासाठी पोळा सणाकडे बघितले जाते. त्यामुळे गावात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. अशा उत्सवांची खरी मजा ग्रामीण भागात असल्याने आजूबाजूच्या शहरातील लोक येथे येतात. गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दोन दिवसीय पोळ्यामध्ये बैल पोळ्याला आकर्षक सजावट असलेल्या बैलांसाठी ग्रामपंचायतीकडून बक्षीस दिले जात असायचे, तर तान्हा पोळ्याला स्थानिक उत्सव कमिटीच्या वतीने बक्षिसे दिली जात होती. छ. शिवाजी महाराज चौकात पोळा भरायचा. तिथे बालगोपालांसाठी खेळणे, फुग्याची दुकाने, खाऊचे दुकाने, बैल सजावट साहित्य असे अनेक दुकाने लागत असल्याने छान उत्सवाचे वातावरण निर्माण होत होते; परंतु यावर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने शासनाने संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम १४४ लावून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे प्रतीकात्मक स्वरूपात घरोघरीच पोळा साजरा करण्याचे आवाहन केल्याने व नियम डावलून पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने यावर्षीही मोठा पोळा व तान्हा पोळा भरत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, तसेच चिमुकल्यांच्या उत्सवावर यंदाही विरजणच पडले आहे.

060921\img-20210906-wa0131.jpg

यंदाही तान्हा पोळा भरत नसल्याने चिमुकल्याच्या उत्सवावर विरजण.

Web Title: Tanha Pola is not only this year, Virajana on Chimukalya festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.