नळ योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:38 PM2018-03-21T23:38:25+5:302018-03-21T23:38:25+5:30

मागील दहा वर्षांपासून कोठारीवासीय पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. वाढती गरज लक्षात घेवून नवीन नळ योजना सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़

Tap plan jam | नळ योजना ठप्प

नळ योजना ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देकोठारी पाणी टंचाई : दुरूस्तीची मागणी

आॅनलाईन लोकमत
कोठारी: मागील दहा वर्षांपासून कोठारीवासीय पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. वाढती गरज लक्षात घेवून नवीन नळ योजना सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
१९८४ मध्ये अस्तित्वात आलेली नळ योजना वीज वितरण कंपनीचे थकीत बिल आणि विहिरीतील तांत्रिक बिघाळामुळे २००७-८ पासून ठप्प आहे. ही नळयोजना सुरु करण्यासाठी ग्रा. पं. कडे गावकऱ्यांनी अनेकदा निवेदन दिले़ पण, दुर्लक्ष करण्यात आले़ ग्रा.पं.च्या नाकर्तेपणामुळे गावात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे़. गावातील ६० हातपंपावर गावकरी तहाण भागवीत आहेत.
खनिज विकास निधीअंतर्गत तीन कोटीपन्नास लाखाची वर्धा नदीवर जलशुद्धीकरणासह योजना मंजूर केली. नळ योजनेचे बांधकाम पूर्ण होऊनही सप्टेंबर २०१७ मध्ये उद्घाटन केले. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी लोटला उन्हाळ्याची सुरुवात झाली. तरीही गावकºयांच्या दारात पाणी पोहचले नाही. नवीन नळ योजनेसाठी वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र ग्रा.पं.कडे जुनी थकबाकी भरल्याशिवाय सुरु करण्यास महावितरण कंपनीने नकार दर्शविला. दरम्यान, सप्टेंबर २०१७ मध्ये उद्घाटनासाठी वीज पुरवठा करण्यात आला़ १ मार्च २०१८ ला ग्रा.पं. पाच लक्ष ६९ हजार ३५० रुपये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रक्कम भरण्यात आले़ तरीही वीज पुरवठा सुरु करण्यात आला नाही.
नळ योजनेच्या प्रस्तावात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम नव्हते. जुन्या पाईप लाईनला दुरुस्त करुन नळ योजना कार्यान्वीत करायची होती. परंतु, जुनी पाईपलाईन नादुरुस्ती असल्याने नवीन पाईप लाईन टाकण्याचा तगादा ग्रा.पं. सरपंच मोरेश्वर लोहे यांनी धरला, असा आरोप गावकरी करीत आहेत़ जीवन प्राधिकरण विभागाने पाईप लाईनचा प्रस्ताव बनविला. मात्र त्यास मंजुरी न मिळाल्याने काम होवू शकले नाही. पूर्वी वीज वितरण कंपनीच्या थकीत देयकापोटी तर आता नवीन पाईपलाईन टाकण्याचा वाट उफाळून आला. या वादात कोठारीकरांचा जीव टांगणीला लागला असून पाण्यासाठी गावकरी त्रस्त झाले आहेत. वादात अडकलेली नळ योजना कोठारीकरांना जीवनदायीनी ठरण्यापेक्षा जीव घेणारी ठरली आहे. पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत.

Web Title: Tap plan jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.