चार दिवसांपासून नळांचे पाणी बंद
By admin | Published: May 28, 2016 01:08 AM2016-05-28T01:08:50+5:302016-05-28T01:08:50+5:30
तळोधी (बा.) शहरात दोन पाण्याच्या टाकी असताना गेल्या चार दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे.
तळोधी (बा.) : तळोधी (बा.) शहरात दोन पाण्याच्या टाकी असताना गेल्या चार दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे- तिकडे भटकंती करावी लागत आहे.
तळोधी (बा.) शहराची लोकसंख्या १५ हजाराच्या वर असून त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी येथे दोन पाण्याच्या टाकी उपलब्ध आहे. मात्र यावर्षी सर्वच नदी, नाले आटले असताना तसेच ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, बोअलवेलचा आधार घ्यावा लागत आहे. येथील जनता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नियमित पाणी पट्टीकर भरत असताना लोकांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या चार दिवसापासून पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. येथील जनतेसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी तळोधीवासीय जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)