महिला कर्मचाºयांसाठी लक्षवेध दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:06 AM2017-11-11T00:06:39+5:302017-11-11T00:06:53+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे राज्य शासनातील महिला अधिकारी कर्मचाºयांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिकरीत्या लक्षवेध दिन म्हणून अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना देण्यात आले. महाराष्ट्रात एकाचवेळी ८ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यात लक्षवेध दिन पाळण्यात आला.
राज्य शासनातील महिला अधिकाºयांचे प्रश्न हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दुर्गा महिला मंच शाखा कार्यरत आहे. या शाखेमार्फत प्रशासनातील महिला अधिकाºयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये या संदर्भात जिल्ह्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये ११ प्रस्ताव संमत करण्यात आले होते. या ११ प्रस्तावाचे निवेदन मुंबई येथे महासंघामार्फत ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तत्पूर्वी चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
यामध्ये बालसंगोपन रजा मंजुरी, वार्षिक वैद्यकीय तपासणी, ग्रॅज्युईटी गणना महागाई भत्ता धरुन करण्याबाबत, प्रसूती रजेला जोडून बालसंगोपनासाठी असाधारण रजा अर्हताकारी सेवा म्हणून मान्य करण्याबाबत, ताण व्यवस्थापनाबाबत शिबिरांचे शासनस्तरावरुन आयोजन करणे, चांगल्या दर्जाची महिला प्रसाधनगृहे उपलब्ध करावे, महिला प्रसाधन गृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, व्हेन्डींग व डिस्पोजल मशिन बसविण्यात यावी, पाळणा घराची सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने, रुग्णालयात, सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, महिलांना लैगिंक छळ प्रतिबंधक कायद्याचे प्रशिक्षण द्यावे, महिलांसाठी विशेष ट्रेन सुरु करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
या संदर्भात जागतिक महिला दिनापूर्वी ८ मार्च २०१८ पर्यंत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी संघटनेचे राज्य मार्गदर्शक अरुण तिखे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सरचिटणीस अविनाश सोमनाथे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, डॉ. सुचिता धांडे, डॉ.कांचन जगताप यांच्यासह अन्य महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.