नेता आणि अभिनेता दोन्हीकडून समाज बदलवण्याचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:22+5:302021-02-17T04:34:22+5:30
अभिनेत्री प्रार्थना बेहरे : ८१ कोटी ९१ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ चिमूर : मी चिमुरात प्रथमच आली आहे. ...
अभिनेत्री प्रार्थना बेहरे : ८१ कोटी ९१ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ
चिमूर : मी चिमुरात प्रथमच आली आहे. ही क्रांतिभूमी असल्याची माहिती झाली. या क्रांतिभूमीचे नेते कीर्तीकुमार भांगडिया हे चिमूरचा कायापालट करून समाज बदलविण्याचे काम करीत आहेत तर चित्रपटातील अभिनेतेसुध्दा समाज बदलविण्याचे काम करीत असतात. मी अनेक चित्रपट केले आहेत. पण मी हसण्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. तेव्हा तुम्हीपण हसत रहा, असा सल्ला ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी दिला.
परिसरातील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मागील पाच वर्षात चिमूर नगर परिषद क्षेत्रात ८१ कोटी ९१ लाख रुपयांच्या विविध विकासात्मक कामासह चिमूर नगरपरिषदच्या ५८ कोटी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व विविध विकास कामाचे उद्घाटन श्रीहरी बालाजी देवस्थानच्या प्रागंणात सोमवारी आ. भांगडीया यांचे हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी माजी आमदार मितेश भांगडिया, सत्कारमूर्ती माजी ऊर्जामंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख अतिथी पवित्र रिस्ता फेम मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे, जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकर, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, ज्येष्ठ नेते बंडू नाकाडे, सुमनताई पिंपळापुरे, डॉ. मंगेश भलमे, गवते महाराज, डॉ. दीपक यावले, नीलम राचलवार, राजू देवतळे, माजी नगराध्यक्ष शिल्पा राचालवार, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा महिला तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, रमेश कंचर्लावार, समीर राचलवार, संजय कुंभारे, संजय खाटीक आदींची उपस्थिती होती.