भरमसाठ करवाढ नगरपालिकेने केली रद्द
By admin | Published: December 1, 2015 05:20 AM2015-12-01T05:20:52+5:302015-12-01T05:20:52+5:30
राजुरा शहरातील भरमसाठ कर रद्द करावा, याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावर सोमवारी
जुन्या इमारतीवर १० टक्के : नवीन इमारतीचे मूल्यांकन
राजुरा : राजुरा शहरातील भरमसाठ कर रद्द करावा, याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावर सोमवारी नगरपालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. ही भरमसाठ करवाढ रद्द करून वाढीबाबत नव्याने निर्णय घेण्यात आला.
यामध्ये जुन्या इमारतीवर दहा टक्के, नवीन इमारतीचे मुल्यांकन करून त्यावर कर लावण्यात येईल आणि विना परवानगी बांधकाम धारकांना दुप्पट कर लावण्याचा निर्णय सर्व साधारण सभेत घेतल्याची माहिती नगराध्यक्षा मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, गटनेते स्वामी येरोलवार, सभापती सखावत अली यांनी दिली.
राजुरा शहर संघर्ष समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आठ दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. या मोर्चेकऱ्यांना सभा घेऊन करवाढ रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. याची फलश्रृती झाली असून आज करवाढ रद्द झाली आहे. या करवाढीला रद्द करण्याकरिता भगवान खनके, मसुद अहेमद, प्रा. अनिल ठाकुरवार यांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पक्षाचे सतीश धोटे, अरुण मस्की, राजेंद्र डोहे यांनी मोर्चात सहभागी होऊन करवाढीबाबत नगरपालिकेला निवेदन दिले होते, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)