निराधार मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षकच पुढे सरसावले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 07:00 AM2020-10-14T07:00:00+5:302020-10-14T07:00:06+5:30

education Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी निधी गोळा करून या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरु केली आहे. या योजनेतून निराधार विद्यार्थिंनींना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जात आहे.

The teacher himself stepped forward for the education of destitute girls. | निराधार मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षकच पुढे सरसावले..

निराधार मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षकच पुढे सरसावले..

Next
ठळक मुद्देसुरु झाली सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनाचंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांचा पुढाकारनिराधार विद्यार्थिंनींना आर्थिक लाभ


साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : निराधार विद्यार्थिंनींना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांना मदत म्हणून जिल्ह्यातील शिक्षकांनी निधी गोळा करून या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरु केली आहे. या योजनेतून निराधार विद्यार्थिंनींना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जात आहे. शासननिधीवर अवलंबून न राहता शिक्षकांनी सुरु केलेल्या या योजनेचा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थिंनींना लाभ मिळत आहे. हा प्रयोग इतर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजारावर शिक्षकांनी २००५-०६ मध्ये एकत्र येत निराधार विद्यार्थिंनीसाठी सावित्रिबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली. या माध्यमातून शिक्षकांनी १५ लाख रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात बँकेत जमा करून त्यातून मिळणाºया व्याजातून विद्यार्थिंनींना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जात आहे. चालू वर्षात हा निधी ३० लाखापर्यंत पोहचला आहे. त्यातून मिळणाºया व्याजातून दरवर्षी विद्यार्थिंनींना आर्थिक लाभ दिल्या जात आहे. यावर्षी २ लाख १५ हजार रुपये व्याज मिळाले असून यातून ३५० विद्यार्थिंनींना शिष्यवृत्ती नुकतीच वितरीत करण्यात आली. या योजनेमुळे निराधार विद्यार्थिंनींना आर्थिक लाभ मिळत असून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग काही प्रमाणात का, होईना सुलभ होत आहे.

या योजनेच्या माध्यमातून निराधार विद्यार्थिंनींना आर्थिक लाभ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांचे काम कौतुकास्पद असून इतर जिल्ह्यानेही अशीच योजना सुरु केल्यास निराधार विद्यार्थिंनींना काही प्रमाणात का, होईना शिक्षणासाठी मदत होईल.
-रेखा कारेकर
शिक्षण सभापती, जि.प.चंद्रपूर


निराधार विद्यार्थिंनींसाठी शिक्षकांनी स्वत: पुढाकार घेवून निधी उभारला. हा निधी बँकेत जमा करून यातून येणाºया व्याजातून सावित्रीबाई फुले दत्तक-पालन योजना सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थिंनींना शिष्यवृत्ती दिली जात आहे.
-दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.चंद्रपूर

Web Title: The teacher himself stepped forward for the education of destitute girls.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.