शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:19 PM2018-12-31T21:19:08+5:302018-12-31T21:19:31+5:30
लाखो डीएड बीएड बेरोजगारांची आशा असलेल्या पवित्र पोर्टलद्धारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा अपलोड करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी डीएड बीएड धारकांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लाखो डीएड बीएड बेरोजगारांची आशा असलेल्या पवित्र पोर्टलद्धारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा अपलोड करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी डीएड बीएड धारकांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे डीएडबीएड धारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. परंतु, जिल्ह्यात शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण असल्याने बेरोजगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये जि. प. शाळांमधील सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्याविषयी व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजुर करावा, जिल्ह्यातील सर्व १०० टक्के रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्यात यावी, बिंदुनामावली विहित वेळेत अद्यावत करण्यात यावी, चंद्रपूर जि. प. अंतर्गत येणाºया उच्च प्राथमिक शाळांमधील विषय शिक्षकांची सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करावी या मागणीचे निवेदन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिले. यावेळी रुपेश खामनकर, सचिन गुरुनुले, विशाल सहारे, मंगेश सहारे, मुन्ना गेडाम, कीर्ती तबोधीकर आदी उपस्थित होते.
महाभरतीविरोधात मेगा मोर्चा
शासनाने १८ हजार पदांची महाभरतीची घोषणा केली आहे. मात्र या भरतीमध्ये ७० टक्के पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेरोजगारांची ही फसवणूक आहे. त्यामुळे या फसव्या पदभरतीच्या विरोधात मेगा मोर्चा काढण्याचा निर्णय डीएड बीएडधारक संघटनेनी केला.