२ जुलैला शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
By admin | Published: June 30, 2016 01:14 AM2016-06-30T01:14:14+5:302016-06-30T01:14:14+5:30
मागील दोन वर्षांपासून शासन नवनवीन जीआर काढत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त अद्यादेश शिक्षकांच्याविरोधात काढत आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ : शासनाच्या नवीन अद्यादेशाच्या विरोधात करणार आंदोलन
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून शासन नवनवीन जीआर काढत आहे. त्यामध्ये सर्वात जास्त अद्यादेश शिक्षकांच्याविरोधात काढत आहे. याविरुद्ध विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २ जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
२८ आॅगस्ट २०१५, २७ मे २०१५ व ८ जानेवारी २०१६ चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अद्यादेश काढला. त्यात तीन वर्गासाठी फक्त तीनच शिक्षक ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भाषाविषयक इंग्रजी, मराठी, हिंदीसाठी एक शिक्षक, गणित व विज्ञानासाठी एक शिक्षक आणि सामाजिक शास्त्रासाठी एक शिक्षक असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच १५ पेक्षा अधिक शिक्षकाची पदे असतील तरच एक पर्यवेक्षक पद राहील. मात्र उपमुख्याध्यापक मिळणार नाही, असाही एक निर्णय शासणाने घेतला. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने १ एप्रिल २०१६ रोजी एक अद्यादेश काढला. त्यामध्ये आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समयोजन होईपर्यंत ‘काम नाही, वेतन नाही’ असे अद्यादेशामध्ये नमूद आहे.
शासणाने काढलेल्या नवनवीन अद्यादेशाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करणार येणार आहे. आंदोलनात केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे, जगदीश जुनघरी, दिगंबर कुरेकार, सुनील शेरकी, वसुधा रायपुरे, नाभिलास भगत, अनिल कंटीवार यांचा समावेश राहणार आहे. या आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)