शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:32 PM2017-09-05T23:32:49+5:302017-09-05T23:33:11+5:30

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Teacher should work to create society: Sudhir Mungantiwar | शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार

शिक्षकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे : सुधीर मुनगंटीवार

Next
ठळक मुद्देशिक्षक पुरस्काराचे वितरण : १६ शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देताना समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात मंगळवारी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राम गारकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो. तसाच समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचेही शिक्षक मोलाचे कार्य करीत असल्याने पूर्वी शिक्षकाकडे समाज सुधारक म्हणूनच बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन होता. त्याच भावनेतून आताही शिक्षकांनी कार्य केल्यास देशाला आकार देण्यात मोठे योगदान शिक्षकांचे राहील, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल अशा पध्दतीने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत व भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सहा हजार शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व सहा हजार शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी पात्र ठरतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शंकर आत्राम, बाबुराव डोंगरवार, ज्योती लहामगे, अनंता भोयर, सीमा भसारकर, आकाश झाडे, मंजुषा साखरकर, रविंद्र उरकुडे, मधुकर वाटेकर, विलास सावसाकडे, हिशोद तुरे, बंडू डाखरे, बाबा कोडापे, कविराज मानकर व भाऊराव तुमडे या जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शिक्षकांचा तर माध्यमिक शिक्षिका संगीता घोडेस्वार यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना आयएसओ नामांकन मिळाला असून त्यापैकी तीन शाळेतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

Web Title: Teacher should work to create society: Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.