एका शिक्षकाने घेतला ५०० वृक्ष लागवडीचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:16+5:302021-06-23T04:19:16+5:30
केशव सीताराम बोंडे हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनुभवलेले प्रसंग बघता, ...
केशव सीताराम बोंडे हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनुभवलेले प्रसंग बघता, त्यांनी स्वतः आपल्या राहत्या घरापासून नगरपालिकेच्या खुल्या जागेपर्यंत तब्बल पाचशे खड्डे खोदून या परिसरात आंबा, सीताफळ, फणस, बदाम, कवट, लिंबू, आवळा, जांभूळ, चिकू, अननस, पेरू, चाफा, वड, कडूलिंबू, बेल, गुडवेल, गुलमोहर, अशी फळझाडे, औषधी उपयोगी तसेच भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या पाचशे वृक्षांचे रोपण करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर त्या वृक्षांचे जतन करण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरातील खुल्या जागेवर वृक्ष लागवड केल्यास शहर हिरवेगार होऊन आपल्या भावी आरोग्यासाठी गुणकारी ठरल्याशिवाय राहणार नाही, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले आहे.
===Photopath===
220621\1422-img-20210622-wa0061.jpg~220621\1424-img-20210622-wa0062.jpg
===Caption===
खुल्या जागेवर पाचशे वृक्ष लागण्याची शिक्षकानी केली सुरुवात.~खुल्या जागेवर पाचशे वृक्ष लागण्याची शिक्षकानी केली सुरुवात.