शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 11:59 AM2022-03-27T11:59:31+5:302022-03-27T12:09:29+5:30

अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली.

teacher with partner arrested by local crime branch smuggling ganja to chandrapur from telangana via gadchiroli | शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

Next

चंद्रपूर : विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देत त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना चिचपल्ली गावाजवळ त्यांना गुन्हे शाखेने पकडले. यावेळी १०३ किलो ८३९ ग्रॅम गांजासह सुमारे ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिक्षक श्रीनिवास नरसय्या मचेडी (वय ५०), शंकर बलय्या घंटा (२९, दोघेही रा. तेलंगणा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

परराज्यातून गडचिरोली मार्गावरून चंद्रपूरकडे दोन चारचाकी वाहनांतून गांजा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळी पथके तयार करून मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ए पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली.

दरम्यान, होंडा सिटी व मारुती स्विफ्ट या दोन गाड्या थांबवून वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांत एकूण ५१ पाकिटांमध्ये १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१ लाख १५ हजार १७० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सर्व ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (क) एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: teacher with partner arrested by local crime branch smuggling ganja to chandrapur from telangana via gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.