समाजाच्या सुख-दु:खात शिक्षकांनी सहभागी व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:35 PM2017-09-03T23:35:46+5:302017-09-03T23:36:03+5:30
गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून मी घडलो, असून पुढील वाटचाल करीत आहे. विविध शिक्षण क्षेत्रातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार उत्साह वाढविण्यासाठी असून शिक्षाकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून मी घडलो, असून पुढील वाटचाल करीत आहे. विविध शिक्षण क्षेत्रातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार उत्साह वाढविण्यासाठी असून शिक्षाकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षक ही पुढील पीढी घडवत असल्याने समाजाच्या सुख दु:खात शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन सांगत आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी केले.
जि. प. प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी संस्थेमार्फंत आयोजित गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सदस्य, तसेच राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पं. स.उपसभापती शांताराम सेलवटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य गजानन बुटके, जि.प. सदस्य ममता डुकरे, पं. स सदस्य नर्मदा रामटेके पुंडलिक मते, प्रदीप कामडी, गीता कारमेगे, लता पिसे, वसंत वारजूकर, बंडू जावळेकर, गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, शिक्षक पतसंस्थेचे पदाधिकारी किशोर नागदेवते, प्रकाश कोडापे, राजकुमार गेडाम, ताराचंद दडमल, मधूकर दडमल, गोहणे, चव्हाण, नरेंद्र मुगले आदी उपस्थित होते.
यावेळी नवोदय परीक्षा मधून संस्कार हनवते, कल्याणी गेडाम, सागर बारे, तसेच शिष्यवृत्ती मधून तनिक्षा वाघे, ओंकार तडस, केंद्रीय बोर्ड परीक्षा वर्ग १० मधून साहिल पोटदुखे, तेजस शेंडे, राज्य बोर्ड मधून पियुष पिसे वैष्णवी गोहने, वर्ग १२ वीतून प्रणाली अतकरे, श्रुष्टी खोब्रागडे, रोशनी बोरकर, पदवीमधून विज्ञान अंकित गावनडे, सगुप्ता कुरेशी अभियांत्रिकीमधून शुभम कामडी, समृद्धी कामडी, नेहा कामडी, आदित्य डुकरे, धनश्री मुंगले आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्र, शिल्ड देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य गजानन बुटके म्हणाले, शिक्षक हा समाजातील अविभाज्यक घटक असून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करीत असले तरी शिक्षकांनी सत्य, आदर्श, कौशल्य, शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन केले. यावेळी शगुप्ता कुरेशी या विद्यार्थिनीने ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत गाईले. यावेळी संपूर्ण सभागृह भारावून गेले
संचालन ठाकरे यांनी केले. यावेळी तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते