शिक्षक देत आहेत वाडीवस्तीवर शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:17+5:302021-08-18T04:33:17+5:30
लोक विद्यालयाचा उपक्रम; गुणवत्ता टिकविण्यासाठी धडपड सावरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी. ...
लोक विद्यालयाचा उपक्रम; गुणवत्ता टिकविण्यासाठी धडपड
सावरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी. विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहावेत, यासाठी नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील लोक विद्यालयातील शिक्षकांनी थेट वाडीवस्तीवर जाऊन कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहे.
इयत्ता ५ ते ७वीचे वर्ग सुरू न झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा नाहीत. अशा ठिकाणी शाळेतील सहाय्यक शिक्षक संतोष नन्नावार व इतर शिक्षक वाडीवस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा इत्यादी अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आपल्या दारी हा उपक्रम नागभीड तालुक्यात कुतूहलाचा विषय ठरत आहे. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे.
कोट
या परिसरातील काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा व्यवस्थित मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.
- आर. बी. विधाते, मुख्याध्यापक, लोक विद्यालय शाळा, तळोधी (बा.)