शिक्षकाच्या मराठी गीताची युवकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:04 PM2018-04-29T23:04:14+5:302018-04-29T23:04:14+5:30

मानवाच्या अंगात अनेक सुप्त गुण जन्मजात असतात. या गुणांना चालना देण्याची जिद्द मनात बाळगून परिश्रम घेतले तर नक्कीच यश येते. असाच काहीसा प्रकार एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थी घडवित आपल्या कलेला रसीकांपुढे आणून दाद मिळविली.

The teachers of Marathi language fond of teachers | शिक्षकाच्या मराठी गीताची युवकांना भुरळ

शिक्षकाच्या मराठी गीताची युवकांना भुरळ

Next
ठळक मुद्देयूट्युबवर धूम : नाट्य कलाकार, गायक ते संगीतकार प्रवास

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मानवाच्या अंगात अनेक सुप्त गुण जन्मजात असतात. या गुणांना चालना देण्याची जिद्द मनात बाळगून परिश्रम घेतले तर नक्कीच यश येते. असाच काहीसा प्रकार एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थी घडवित आपल्या कलेला रसीकांपुढे आणून दाद मिळविली. नुकतेच एका म्युझिक कंपनीने त्यांच्या यु ट्युब चॉनलवर ‘नव्या नव्या इश्काचे, नवे नवे हे रंग...’ हे मराठी रोमॉटीक गीत प्रदर्शित केले. या मराठी गिताने सोशल मीडियावर युवकांना भुरळ पाडली आहे.
युवराज गजानन गोंगले असे या जि. प. शिक्षकाचे नाव आहे. मूल तालुक्यातील विरई या छोट्याशा खेड्यात जन्मलेले युवराज यांना बालपणापासूनच संगीताची आवड. परंतु, त्यावेळी संगीताचे शिक्षण घेता आले नाही. मात्र संगीतकार होण्याचे स्वप्न उरी बाळगून पुढे प्रवास करीत होता. सोबतीला मोठी ताई माला खोबरागडे यांचे मार्गदर्शन होते. १९९६ ला चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे जि. प. शाळेत ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आपली कला पुढे नेत मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले. सुपर्ब प्लॉन, पहिल पाऊल जीवनाचं या दोन चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. आता ते ‘एक होत माळीन’ हा चित्रपट करत आहेत. या चित्रपटाची गाणीही त्यांनीच लिहिली आहेत. शिक्षकी पेशा सांभाळत कर्तव्यात कुठलाही कसूर न करता आपल्या कलेला ते जपत आहेत. आज घडीला युवराज गोंगले हे नागभीड पंचायत समिती मधील जि. प. प्राथ. शाळा देवटेक येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
झाडीपट्टीच्या अनेक नाटकांना दिले संगीत
झाडीपट्टीत एक गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता, लेखक व दिग्दर्शक म्हणून काम करताना ‘बाळा मीच तुझी आई रे’ आणि ‘तुझ्यात जीव गुंतला रे’ या दोन्ही नाटकांचे लेखन केले. या दोन्ही नाटकांनी झाडीपट्टीच्या रसिकांना अगदी भुरड घातली. श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगाव या मंडळाच्या गववर्षीपासून गाजत असलेल्या ‘अस्सा नवरा नको गं बाई’ आणि ‘गंगा जमुना’ या नाटकांना गीतकार, संगीतकार व गायक म्हणून त्यांचीच गाणी आहेत. युवती म्युझीकने युट्युबवर रिलीज केलेल त्याचं गाणं युवकांना अक्षरश: वेड लावत आहे.

नव्या नव्या इश्काचे, नवे नवे रंग हे गीत किशोर तोकलवार यांनी लिहिलेल आहे. त्याला स्वत:च संगीत देऊन आपण गायल आहे. मी स्वत: संगीतबद्ध केलेली आणखी तीन गाणी या चॉनलवर प्रदर्शित होणार आहेत.
- युवराज गोगंले
शिक्षक तथा गायक, संगीतकार, नागभीड.

Web Title: The teachers of Marathi language fond of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.