परीक्षाकाळात शिक्षकांचे असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:57 PM2019-01-20T22:57:48+5:302019-01-20T22:58:27+5:30

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.

Teachers' Non-Cooperation Movement During the Examination | परीक्षाकाळात शिक्षकांचे असहकार आंदोलन

परीक्षाकाळात शिक्षकांचे असहकार आंदोलन

Next
ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांकडे कानाडोळा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्या सोडवणुकीसाठी विजुक्टा व महासंघाने अनेकदा आंदोलन केलीत. मात्र, प्रत्येक वेळेस आश्वासन देण्यात आले. संघटनेने विद्यार्थी हितासाठी मार्च २०१७ चे आंदोलन शिक्षमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मागे घेतले. त्यानंतर झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यात. मात्र लेखी आश्वासनांची पूर्तता केली नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अत्यंत उर्मटपणे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. २१ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत अन्यायकारक शासनादेश काढला. शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी शिक्षण व्यवसायिक देशधडीला लावली. जुनी पेन्शन योजना रद्द करून शिक्षकांचे भवितव्य अंधारकायम केले. ३१ आॅक्टोबर २००४ ला एक शासनादेश काढून जुनी पेन्शन योजना बंद केली. ज्याचा विधिमंडळात कायदाही केला नाही. अशा बेकायदेशिर निर्णयामुळे शासनाच्या विरोधात शिक्षकांत असंतोष पसरलेला आहे. मागील चार वर्षात सरकारने शिक्षकांसाठी कोणतेही चांगले निर्णय घेतले नाही. त्यामुळे राज्य महासंघ व विजुक्टाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात धरणे आंदोलन, मुकमोर्चा व परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष. प्रा. अशोक पोफळे, प्रा. धनंजय पारके, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. रवी जोगी. प्रा. बहादे, प्रा. विजय तराळे, प्रा. सुधाकर ढवस, प्रा. किशोर ढोक, प्रा. अमोल काकडे उपस्थित होते

Web Title: Teachers' Non-Cooperation Movement During the Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.