शिक्षकांच्या समस्या सोडवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:52+5:302021-02-25T04:35:52+5:30
तज्ज्ञ चिकित्सकांची पदे भरा कोरपना : तालु्क्यातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, चर्मरोग तज्ज्ञ चिकित्सकांची आवश्यकता आहे. त्यामुळे नियुक्ती करण्याची ...
तज्ज्ञ चिकित्सकांची पदे भरा
कोरपना : तालु्क्यातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, चर्मरोग तज्ज्ञ चिकित्सकांची आवश्यकता आहे. त्यामुळे नियुक्ती करण्याची मागणी आहे. कोरपना तालुका तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय आहे. या परिसरात ग्रामीण रुग्णालय वगळता एकही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे येथे रुग्णांची गर्दी मोठी असते. परंतु या रुग्णालयात विविध रोगाचे तज्ज्ञ चिकित्सक उपलब्ध नसल्याने रुग्णांंना चंद्रपूर, वणी, आदिलाबाद, नागपूर येथील रुग्णालयात जावे लागते. सद्यस्थितीत तज्ज्ञ चिकित्सकांअभावी रुग्णांना उपचार घेण्यास अडचण येत असून, इतरत्र ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांचा आर्थिक खर्च व वेळ वाया जात असल्याने सर्वसामान्य रुग्ण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरपना ग्रामीण रुग्णालयात त्वरित तज्ज्ञ चिकित्सकाची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रुग्णांकडून होत आहे.
अवैध वाहतूक बंद करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील दुर्गम भागात अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूृकदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे़
कृषी विभागातील रिक्त पदे भरावी
चंद्रपूर : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत़. त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़. राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या, तसेच जिल्हा परिषदेच्याही विविध योजना आहेत़ पण या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. त्याचा परिणाम अंमलबजावणीवर होत आहे़.