काेराेना याेध्दा शिक्षकांना विशेष वेतनवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:20+5:302020-12-29T04:27:20+5:30
ब्रम्हपुरी : काेराेनाच्या काळात शिक्षकांनी सर्वेक्षण, काेविड सेंटर ड्युटी, माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम राबविण्यात शासनास मदत केली. ...
ब्रम्हपुरी : काेराेनाच्या काळात शिक्षकांनी सर्वेक्षण, काेविड सेंटर ड्युटी, माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम राबविण्यात शासनास मदत केली. जीवाची पर्वा न करता शिक्षकांनी नेमुण दिलेले काम पूर्ण केले, असे कर्तव्ये पार पाडताना काहींना प्राण गमवावे लागले तर काहींना बाधा झाली. त्यामुळे काेराेना याेध्दा शिक्षकांना विशेष वेतनवाढ द्यावी, अशी मागणी क्रुतिसंसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारे कण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यशवंत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस, आरोग्य, न. प. कर्मचाऱ्यांनीही काेराेना नियंत्रणसाठी काम केले, याची दखल शासनाने घ्यावी, काेराेना याेध्दा मानधन कर्मचाऱ्यांना मानधनात २० टक्के वाढ करावी, काेतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करावी, धानपिक पट्टयातील तुळतुळाग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, वाघग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, पहिली प्रवेशाचा नविन अध्यादेश यंदाच लागू करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या. तहसीलदार धनश्री यादव यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात यशवंतराव खोब्रागडे, भिमराव बनकर, भाेजराज भैसारे, नामदेव कावळे, हेमराज इनकने, स्वप्निल रामटेके, अनिल उंदिरवाडे, माेतीलाल देशमुख, भाऊराव मेश्राम, राहुल रामटेके, प्रमोद रामटेके उपस्थित होते.