शैक्षणिक उपक्रमात शिक्षकांची मोलाची कामगिरी

By admin | Published: October 19, 2016 02:04 AM2016-10-19T02:04:55+5:302016-10-19T02:04:55+5:30

पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत देवाडा बुज येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक गंगाधर गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्रात ...

Teacher's valuable performance in educational activities | शैक्षणिक उपक्रमात शिक्षकांची मोलाची कामगिरी

शैक्षणिक उपक्रमात शिक्षकांची मोलाची कामगिरी

Next

देवाडा (बु) शाळा : विद्यार्थ्यांना दिलासा
देवाडा बुज : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत देवाडा बुज येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक गंगाधर गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभाग दर्शवून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. ते मोलाची कामगिरी बजावित असल्याचा प्रत्यय येत आहे.
यापूर्वी गायकवाड यांनी लालहेटी, घोसरी, जूनगाव येथे सेवा दिली. त्यानंतर त्यांचे देवाडा बुज शाळेत स्थलांतर झाले. त्यांनी शैक्षणिक कार्य पारदर्शक अबाधित राखून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणला आहे. देवाडा बुज शाळेत सांस्कृतिक उपक्रमाची कास धरून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास घडवून आणण्यासाठी स्वत: पुढाकार घेत असतात. त्यासाठी कौशल्यावर भर दिल्या जाऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख होऊन भावी काळात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. ते पुढाकार घेत विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतात. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्याना प्रेरणा मिळत असते.
विशेषता विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आनंदायी शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन आणि चिंतन या सर्व बाबी अंगिकारून अध्यापन प्रक्रियेवर अधिकच लक्ष्य केंद्रीत केले जात आहे. त्या शिक्षकाच्या अथांग परिश्रमाने लिहिता वाचता न येणारे विद्यार्थीही शिक्षण प्रवाहात आल्याचे पालकाकडून ऐकण्यात येते. त्याचप्रमाणे शाळेत आनंदायी व निसर्गमय वातावरण निर्मिती करण्यासाठी त्याच्या पुढाकाराने बाल उद्यान निर्माण करण्यात आले आहे. त्यांनी उद्यानाची देखरेख करीत फुलझाडे लावण्यासाठी अथांग परिश्रम घेतले. त्यासाठी सर्व शिक्षकांचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Teacher's valuable performance in educational activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.