पानवडाळा येथील विद्यार्थ्यांना युवकांकडून अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:56 AM2020-12-11T04:56:45+5:302020-12-11T04:56:45+5:30

भद्रावती : कोविड १९ प्रादुभार्वामुळे शाळा बंद असली तरी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ...

Teaching to the students of Panwadala by the youth | पानवडाळा येथील विद्यार्थ्यांना युवकांकडून अध्यापन

पानवडाळा येथील विद्यार्थ्यांना युवकांकडून अध्यापन

Next

भद्रावती : कोविड १९ प्रादुभार्वामुळे शाळा बंद असली तरी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पानवडाळा येथील उच्चशिक्षित युवक विवेक पिंपळकर, मंगेश पिंपळकर, राहुल आवारी, ईश्वर उताने आदींनी नि:शुल्क अध्यापन करीत आहेत.

त्र्यंबक पिंपळकर, रामाजी आवारी या पालकांनी मुलांना शिकण्यासाठी आपले घर उपलब्ध करून दिले.सकाळी सहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत वर्ग शारीरिक अंतर ठेवून वर्ग चालतात. इंग्रजी गणित विज्ञान विषयाचे विशेष मार्गदर्शन केले जाते. मुख्याध्यापक गुगल, मत्ते शिक्षक उपस्थित होते. येथील शाळेतून सर्वाधिक विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसविले आहेत. नियमित स्पर्धा परीक्षेचे वर्ग आयोजन केले जाते.

बॉक्स

कोची येथेही शिकवणी

कोची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अश्विनी बंडुजी नवघरे, प्रणाली बंडुजी नवघरे या ज्ञानप्रेमी विद्यार्थिनी मुलांना ज्ञानाचे धडे देत आहेत. अश्विनी या अभियांत्रिकी पदवीधारक तर प्रणाली बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहेत.

Web Title: Teaching to the students of Panwadala by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.