गणेश मंडळांना वीज जोडणीसाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:07 PM2017-08-23T23:07:31+5:302017-08-23T23:07:54+5:30

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व ४ रुपये ३१ पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली....

Team for power connection to Ganesh Mandals | गणेश मंडळांना वीज जोडणीसाठी पथक

गणेश मंडळांना वीज जोडणीसाठी पथक

Next
ठळक मुद्देमहावितरणचा उपक्रम : अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व ४ रुपये ३१ पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने एक पथक गठित केले आहे.
गणेश मंडळांना सहजपणे वीज जोडणी मिळावी याकरिता महावितरणद्वारे विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक ठिकठिकाणी गणेश मंडळांना भेटी देवून, वीज जोडणी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहेत. ७८७५७६१३२२ व ७८७५७६११९५ या क्रमांकांवर संपर्क साधून गणेश मंडळांना आॅन द स्पॉट वीजजोडणी गणेमंडळाच्या ठिकाणीच मिळू शकणार आहे.
गणेश मंडळांना त्यांच्या दारी आॅन द स्पॉट तात्पुरती वीजजोडणी गणेशोत्सवाच्या काळात, मिळण्यासाठी या पथकांद्वारे ए-१ फॉर्म गणेश मंडळांना उपलब्ध करून देणे व भरून घेणे, टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून देणे व वीज जोडणीसाठी लागणाºया शुल्काची डिमांड देणे इत्यादी मदत या पथकाद्वारे करण्यात येणार आहे. विजेचा अनधिकृत वापर हा धोकादायक असतो व त्यामुळे जीवित अथवा आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे विजेच्या अनधिकृत वापरावर हे पथक विषेश लक्ष ठेवणार आहे.
चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे यांच्या हस्ते गणेश मंडळ वीज जोडणी पथकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय जिझिलवार, अविनाश कुरेकार, उपकार्यकारी अभियंता समीर टेकाडे, व्ही. एम. हेडाऊ, नितेश ढोकणे, विष्लेश लांजेवार, सहायक अभियंता वैशाली, बंटी चव्हाण आदी यांच्यासह वीज कंपनीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नवीन वीज जोडणीकरिता घरपोच सेवा
चंद्रपूर : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन आॅन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे. नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.

Web Title: Team for power connection to Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.