तुकूम जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:38 AM2019-05-12T00:38:53+5:302019-05-12T00:40:08+5:30

येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Technical failure in Tukoom water purification system | तुकूम जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड

तुकूम जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शुक्रवारी तुकूम येथील जलशुध्दीकरण यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. सध्या चंद्रपुरात सूर्य आग ओकत आहे. सातत्याने महिनाभर पारा ४५ अंशाच्या वर असल्यामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. नागरिक पाण्यासाठी इतरत्र भटकत आहेत. दरम्यान, शनिवारी चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दैनंदिन कामावर परिणाम झाला. आधीच विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. अशात नळही येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना कुलर बंद ठेवून रहावे लागत आहे.
बिघाड तात्काळ दुरुस्त
शनिवारी नळ आले नाही. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता मनपा आयुक्त संजय काकडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी, रवींद्र कळंबे, नरेंद्र पवार, अतुल टिकले यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी अहोरात्र काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. येत्या १-२ दिवसात संपूर्ण चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.


शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. कधी तांत्रिक बिघाडामुळे समस्या उदभवते. त्यासाठी पालिका अधिकारी-कर्मचारी वर्ग दिवसरात्र कार्यरत आहेत. पाणीपुरवठयासाठी मनपा कटीबद्ध आहे, नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे.
- संजय काकडे, आयुक्त, मनपा चंद्रपूर.

Web Title: Technical failure in Tukoom water purification system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी