तहसीलदारांनी केली शेतकऱ्यांच्या रस्त्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:57+5:302021-06-21T04:19:57+5:30

सावली : सावली तालुक्यातील हिरापूर येथे शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे हिरापूर येथील ...

Tehsildar inspected the farmers' road | तहसीलदारांनी केली शेतकऱ्यांच्या रस्त्याची पाहणी

तहसीलदारांनी केली शेतकऱ्यांच्या रस्त्याची पाहणी

Next

सावली : सावली तालुक्यातील हिरापूर येथे शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे हिरापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १६६ च्या कलम १४३ अन्वये अर्ज सादर केला.

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तहसीलदार पाटील यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली.

हिरापूर येथे शेतावर ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. भूमापन क्रमांक २३८ व भूपमान क्रमांक २३९ या शेतकऱ्याच्या धुऱ्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी जाणे येणे करायचे. मात्र, संबंधित शेतकरी रस्ता अडवून धरायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत असायची. नेहमीची ही समस्या असल्यामुळे अनेकदा भांडणे व्हायची.

शेतकऱ्याच्या रस्त्यासाठी इतर कुठलाही मार्ग नसल्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले. तहसीलदार पाटील यांनी प्रत्यक्ष चौकशी केली. याप्रसंगी बोथलीचे तलाठी अमोल पोतणवार उपस्थित होते.

गेले अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीकडे जाणारा रस्ता आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अंतर्गत रस्ता उपलब्ध करून अनेक वर्षांची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी, अशी भावना हिरापूर येथील शेतकरी नितीन गोहणे, सरचिटणीस तालुका काँग्रेस कमिटी, शरद कन्नाके, उपसरपंच हिरापूर, रुमाजी कोरडे, केसरी मुनघाटे, महेश्वर गेडाम, विनोद जन्मपलवार, नानाजी कोरडे, मंगलदास कोरडे, विनोद बांगरे, संजय सायंत्रावार, कविता गेडेकर, सत्यवान गेडेकर यांनी केली आहे.

Web Title: Tehsildar inspected the farmers' road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.