भद्रावतीच्या तेजस कुंभारेने केला प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:45+5:302021-05-04T04:11:45+5:30
मानव सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल भद्रावती : आई व दोन्ही भाऊ कोविड पॉझिटिव्ह आहेत. आई मंचेरीअल येथील हॉस्पिटलमधे, एक ...
मानव सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
भद्रावती :
आई व दोन्ही भाऊ कोविड पॉझिटिव्ह आहेत. आई मंचेरीअल येथील हॉस्पिटलमधे, एक भाऊ नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये व एक भाऊ चंद्रपूर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. चंद्रपूर येथे भरती असलेल्या भावाला प्लाझ्माची सक्त गरज असल्याने ए प्लस ब्लड ग्रुपचा प्लाझ्मा डोनर हवा आहे, असा संदेश व्हॉटसॲप ग्रुपवर व्हायरल केला. त्यानंतर भद्रावती येथील तेजस कुंभारे हा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आला.
रवी भोगे यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. रवीच्या भावाला प्लाझ्माची गरज असल्याने रवीने ' शेतकरी मित्र ' या व्हॉटसॲप ग्रुपवर प्लाझ्मा डोनरसाठी एक मेसेज टाकून मदतीसाठी आवाहन केले. हा मेसेज वाचून त्याच ग्रुपमधील सदस्य असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी रवी भोगेला कॉल केला व परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले. त्याला धीर देत, घाबरु नको मी शक्य तेवढे सहकार्य तुला करतो, असे म्हणून आश्वस्त केले. त्यानंतर प्लाझ्मा डोनर शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. तेजस कुंभारे नावाचा भद्रावती शहरातील युवक हा अडीच महिन्याअगोदर पॉझिटिव्ह होऊन गेला. प्लाझ्मा दानासाठी तो समोर आला व प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली. रवींद्र शिंदे यांनी स्वत:चे वाहन देऊन व तेजस कुंभारे या डोनरसोबत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर यांची साथ देऊन नागपूरला पाठविले. रवी भोगे यांचा भाऊ श्रीकांत भोगे (३७) याला आता प्लाझ्मा मिळणार आहे.