उन्हाचे चटके; ताडोबात सफारीच्या वेळेत बदल
By राजेश भोजेकर | Published: April 20, 2023 10:18 AM2023-04-20T10:18:07+5:302023-04-20T10:20:32+5:30
उन्हाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत
चंद्रपूर : उष्णतेचा पारा ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. परिणामी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्र सफारीच्या वेळेत गुरुवार २० एप्रिलपासून बदल केला आहे. कोरमध्ये सकाळची सफारी पहाटे ५.३० ते सकाळी ९.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ७ अशी राहणार आहे.
चंद्रपूर शहरात उन्हाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने या शहरात दुपारी १२ वाजतापासून संचारबंदी लागू केल्यासारखी स्थिती असते. वाढलेल्या उन्हाचा तडाखा आता पर्यटन व्यवसायालासुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. ताडोबात सफारीसाठी येणारे पर्यटक ४३.६ अंश सेल्सिअस तापमान बघून घाबरले आहेत. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना उन्हाच्या तडाख्याचा फटका बसू नये म्हणून ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल केले आहे.