श्रमदान करून मंदिर परिसर केला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:03+5:302021-08-24T04:32:03+5:30

चंद्रपूर : येथील पठाणपुरा गेट बाहेर असलेल्या फुटबाॅल ग्राऊंडचे मागे असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ...

The temple premises were cleaned by hard work | श्रमदान करून मंदिर परिसर केला स्वच्छ

श्रमदान करून मंदिर परिसर केला स्वच्छ

Next

चंद्रपूर : येथील पठाणपुरा गेट बाहेर असलेल्या फुटबाॅल ग्राऊंडचे मागे असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला होता. यामुळे भाविकांना त्रास होत होता. भाविकांचा त्रास लक्षात घेऊन येथील स्वराज फाउंडेशन, चांडगड ट्रेकर्स आणि हिंदूराष्ट्रम ग्रुप तर्फे श्रमदान करून केरकचरा साफ करण्यात आला. यामुळे मंदिर परिसर स्वच्छ आणि निटनेटका झाला आहे.

मंदिर परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. गवत तसेच पालापाचोळ्यामुळे भाविकांना मंदिरात येताना त्रास होत होता. त्यामुळे सर्वांनी मिळत सकाळी १० वाजेपर्यंत श्रमदान केले. यासाठी देवानंद साखरकर, अश्विन मुसळे, स्वाती बोरडकर, राजू जोशी, चेतन पटेल, कार्तिक मुसळे, एल. एस. मद्दीवार, हिमांशू दहेकर, नरेंद्र लभाणे, अमय सुखदेव, गणेश मसराम, रोहित तुरांकर यांची उपस्थिती होती.

Web Title: The temple premises were cleaned by hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.