प्रकल्पग्रस्तांच्या सहकुटुंब आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 08:32 PM2017-03-10T20:32:21+5:302017-03-10T20:32:21+5:30

माजरी येथील नागलोन खुल्या कोळसा खदान 2 येथे पाटाळा, पळसगाव व शिवाजीनगर येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी नोकरी न मिळाल्याने दहा दिवसांपासून सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू होते.

Temporary suspension of project collaboration co-workers | प्रकल्पग्रस्तांच्या सहकुटुंब आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

प्रकल्पग्रस्तांच्या सहकुटुंब आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

Next

ऑनलाइन लोकमत

माजरी (चंद्रपूर), दि. 10 - माजरी येथील नागलोन खुल्या कोळसा खदान 2  येथे  पाटाळा, पळसगाव व शिवाजीनगर येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी नोकरी न मिळाल्याने दहा दिवसांपासून सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू होते. रात्र दिवस महिला वर्ग कोळसा खदनात दटून होते. दहा दिवसांपासून काम बंद आंदोलनामुळे वेकोलीचे उत्पादन 165 हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले असून 50 कोटी रुपयांचा वेकोलीला टका बसला आहे.  
 
वेकोली माजरीच्या प्रशासनाला  गेल्या दहा दिवसांपासून तोडगा काढण्यात यश मिळाले नाही.  पण जिल्हाधिका-यांनी आज चंद्रपूर  सभागृह येथे वेकोली नागपूरचे अधिकारी घोष व परांजपे, वेकोली माजरीचे महाप्रबंधक सत्येंद्र पांडे, उप पोलीस अधीक्षक राजपुत, उप विभागीय अधिकारी वरोरा, पोलीस उपअधिकारी वरोरा, माजरीचे थानेदार कृष्ण तिवारी, प्रहार संघटनेचे गजानन कुबडे, अमोल डुकरे, आणि प्रकल्पग्रस्त बैठक बोलाऊन 30 एप्रिल 2017 पर्यंत सर्वच प्रकल्पग्रस्त नोकरीदेण्याचे लिखित आश्वासन दिले व 28 जणांना नोकरीचे आदेश देण्यात आलेत. 
 
न्यायालयात सर्वांनाच नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांनी 30 एप्रिलपर्यंत तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.  प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदीप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफ़ुल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मीराबाई ढवस यांनी सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू केले होते.  

Web Title: Temporary suspension of project collaboration co-workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.