दहावीत मुलींचेच वर्चस्व
By admin | Published: June 18, 2014 12:06 AM2014-06-18T00:06:51+5:302014-06-18T00:06:51+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.३५ टक्के लागला.
जिल्ह्याचा निकाल ८१.३५ % : जिवती तालुका ९७.२८ %
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.३५ टक्के लागला. विदर्भात चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीप्रमाणे दहावीत यंदाही मुलीच मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४५० शाळांमधून ३१ हजार ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ५७६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यात ३० हजार ९२३ विद्यार्थी नियमित तर खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या ६५३ विद्यार्थ्याचा समावेश आहे. पैकी एकूण २५ हजार ६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.