बल्लारपुरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:35+5:302021-04-05T04:24:35+5:30

बल्लारपूर : येथील अमन पसंद कमिटीच्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन शुक्रवारी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते ...

Tennis Ball Cricket Tournament at Ballarpur | बल्लारपुरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

बल्लारपुरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

Next

बल्लारपूर : येथील अमन पसंद कमिटीच्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन शुक्रवारी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते पार पडले. तालुका क्रीडा मैदानावर आयोजित बल्लारपूर युनिटी प्रीमिअर लीगच्या नावाने होत असलेली ही क्रिकेट स्पर्धा ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत विविध क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशीचा सामना पोलीस विभाग बल्लारपूर व नगर परिषद बल्लारपूर यांच्यात झाला. यात पोलीस विभागाच्या चमूने उत्कृष्ट प्रदर्शन करून मॅच जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंजना नागतोडे, सीमा ठाकूर, अमन पसंद कमिटीचे अध्यक्ष इस्माईल ढाकवाला, ताहीर हुसेन, सय्यद अजीज, आफताब पठाण, अब्दुल आबिद शेख ताज अली, संजय दुबे, फिरोज शेख, मोहम्मद सिराज, रणजित लोहकरे, आसिफ शेख, तन्वीर शेख, शंकर तिलोकानी आदी उपस्थित होते.

Web Title: Tennis Ball Cricket Tournament at Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.