सिनर्जी वर्ल्ड वसाहतीत हत्या बंगाली कॅम्पात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:20+5:30
या हत्येची वार्ता पोहचताच बंगाली कॅम्प चौकात संतप्त नागरिकांचा जमाव झाल्याने पोलिसांची दमछाक झाली होती. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मनोज मंगळवारपासून घरीच परतला नाही. त्याची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले. घटनास्थळी मृतक मनोजच्या मृतदेहावर एकही वस्त्र नव्हते. यावरून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरसह जिल्ह्यात खूनाच्या घटनांचे सत्रच सुरू झाले आहे. पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसारा येथे सिनर्जी वर्ल्ड वसाहतीतील एका फ्लॅटमध्ये बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेल्या इसमाची कुºहाडीचे घाव घालून निर्घूण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मनोज अधिकारी (३८) रा. बंगाली कॅम्प असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बंगाली कॅम्प प्रभागाचे अपक्ष नगरसेवक अजय सरकारसह रवींद्र बैराखी या दोघांना ताब्यात घेतले असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले.
या हत्येची वार्ता पोहचताच बंगाली कॅम्प चौकात संतप्त नागरिकांचा जमाव झाल्याने पोलिसांची दमछाक झाली होती. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मनोज मंगळवारपासून घरीच परतला नाही. त्याची हत्या झाल्याचे आज उघडकीस आले. घटनास्थळी मृतक मनोजच्या मृतदेहावर एकही वस्त्र नव्हते. यावरून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलले जात आहे. सिनर्जी वर्ल्ड वसाहतीत मनोजचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट आहे. त्याच फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटना उघड होताच तपासाची चक्रे फिरवून संश्यित म्हणून दोघांना ताब्यात घेतले आहे. मनोज हा सेवाभावी वृत्तीचा असल्याने त्याची बंगाली कॅम्प परिसरात चांगली प्रतिमा होती. मनोजची हत्या झाल्याचे माहिती होताच बंगाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला. रामनगर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. रात्रीउशिपर्यंत रामनगरचे सहायक पोलीस निरीक्षक उगेवार, पोलीस निरीक्षक मोरे घटनास्थळाचा पंचनामा करीत होते.
हत्येच्या घटनांनी चंद्रपूर हादरले
आठ दिवसांत चंद्रपूर शहरातील चवथा व जिल्ह्यातील आठवी हत्येची घटना आहे. नवे पोलीस अधीक्षक रूजू झाल्यापासून हे हत्येच्या घटनांचे सत्र सुरू झाल्याने त्यांचे लक्ष या घटनांकडे वळले आहे. मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांसह गुन्हेगारी प्रवृती फोफावल्याचा परिणाम याघटनांमुळे पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. या घटनांची चंद्रपूर हादरले आहे.