‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:32+5:30

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते.

The tent of 'Shubhmangal' ready, but not the couple! | ‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

Next
ठळक मुद्देदहा हजारांचे मिळते अनुदान : महिला व बालविकास विभागाची योजना

रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर लेकींच्या सामूहिक विवाहासाठी अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी आठ वर्षांपूर्वी महिला व बालविकास विभागाच्या वतीने शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी जोडपीच येत नसल्याने जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. मागच्या वर्षी ८६ जोडप्यांनी याचा लाभ घेतला असला तरी यावर्षी एकही प्रस्ताव आलेला नाही.
या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते. दरवर्षी जे प्रस्ताव सादर होतील, त्याची छाननी महिला व बालविकास विभागाच्या वतीने केली जाते. त्यानंतर हे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे अनुदान मंजुरीसाठी पाठविले जातात. मात्र, मागील काही वर्षात बोटावर मोजण्या इतक्याच जोडप्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींनी बँकेची माहिती, बँक शाखा, खाते क्रमांक, इत्यादींची माहिती अर्जात नमूद करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करावी. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्याची व्हिडीओ रेकॉर्डींग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र स्वयंसेवी संस्थेने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अनुदान अदा करण्यात येते.
योजना चांगली असली तरी विवाह सोहळ्याबाबत अद्यापही अनेक वर व वधुकडील वडीलधारे गंभीर असल्याने या योजनेकडे ते पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.

जनजागृतीची गरज
घर बांधणे आणि लग्न सोहळा आयोजित करणे सहज बाब नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. यातील अवाढव्य खर्च वाचावा, यासाठी ही योजना असली तरी पालक याकडे गंभीरतेने बघत नाही. त्यामुळे जनजागृती गरज आहे.

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत शेतकरी, मजूर यांच्या मुला- मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्र व इतर खर्चासाठी दहा हजार रुपये देण्यात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी नोंदणी झालेल्या ८६ जोडप्यांना लाभ दिला. यावर्षी मात्र एकही जोडप्याचा प्रस्ताव आला नाही.
-आर. एन. टेटे
महिला,बालविकास अधिकारी, चंद्रपूर
अशा आहेत अटी
या योजनेचा लाभ घेणाºया जोडप्यातील वधू ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी,
त्याबाबत ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा दाखला असावा.
विवाह सोहळ्याच्या दिवशी वराचे वय २१ वर्षे व वधूचे वय १८ वर्षे यापेक्षा कमी असू नये.
याबाबत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा जन्माच्या स्थानिक प्राधिकाºयाने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाºयाचे वयाबाबतचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.
तलाठी किंवा तहसीलदार यांनी दिलेला एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, वधू-वरांना प्रथम विवाहासाठीचे हे अनुदान पुनर्विवाहाकरिता अनुज्ञेय राहणार नाही.
वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील.

Web Title: The tent of 'Shubhmangal' ready, but not the couple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न