अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:09+5:302021-09-12T04:32:09+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी डी.एड. (पदविका) आणि बी.एड. (पदवी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी डी.एड. (पदविका) आणि बी.एड. (पदवी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात सन २०११ पासून शिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेक विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहेत. त्यात २०१७ पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू झालेली भरतीप्रकिया मध्यंतरीच थांबली आहे. मागील दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. शालेय शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा घेण्याची घोषणा आवेदन अर्ज मागविले आहे. या परीक्षेला केवळ पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असून, शिक्षक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दूर ठेवल्याने नाराजी होती. शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा देण्याची संधी दिली आहे. ही बाब विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थांना दोन वर्षे वाट पहावी लागणार नाही. शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा दावा भाजयुमो चंद्रपूर महानगर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केला आहे.