सहा पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षकांचे ठाणे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:45+5:302021-08-26T04:30:45+5:30

मागील महिन्यात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना बदल्याचे वेध लागले ...

Thane change of six police inspectors, ten assistant police inspectors | सहा पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षकांचे ठाणे बदल

सहा पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षकांचे ठाणे बदल

Next

मागील महिन्यात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना बदल्याचे वेध लागले होते. दरम्यान वाहतूक पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव, पोलीस कल्याण विभागात कार्यरत एस.एस. भगत, पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुर्लीधर कासार यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. यांतर्गत आर्थिक गुन्हे शाखा येथील प्रवीणकुमार पाटील यांची वाहतूक शाखा, भद्रावतीचे ठाणेदार सुनीलसिंग पवार यांची मानव संसाधन विकास, जिल्हा विशेष शाखेचे संतोष आमले यांची गडचांदूर, गडचांदूर येथील ठाणेदार गोपाल भारती यांची भद्रावती, चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांची जिल्हा विशेष शाखा, भिसीचे ठाणेदार एम. सी. गभणे यांची चिमूर येथे बदली करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेमध्ये अमरावती येथील प्रवीण इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोंडपिपरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धोबे यांची रामनगर पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन येथील जीवन राजगुरू यांची गोंडपिपरी, चंद्रपूर शहर येथील अविनाश मेश्राम यांची शेगाव, टेकामांडवा येथील प्रकाश राऊत यांची भिसी, भद्रावती येथील सचिन जगताप यांची जिवती तर विरुर स्टे येथे राहुल चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. सर्वांना त्वरित रुजू होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले आहेत.

Web Title: Thane change of six police inspectors, ten assistant police inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.