जनसमस्यांवर ठाणेदारांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:44+5:302021-08-18T04:33:44+5:30

ग्राहक पंचायत भद्रावतीचे कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल माहिती विचारली. पोलीस विभागाचे ४६ कॅमेरे शहरात लागले ...

Thanedar interacted with senior citizens on public issues | जनसमस्यांवर ठाणेदारांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

जनसमस्यांवर ठाणेदारांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

Next

ग्राहक पंचायत भद्रावतीचे कार्याध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल माहिती विचारली. पोलीस विभागाचे ४६ कॅमेरे शहरात लागले आहेत. ते सगळे सुस्थितीत आहे. शिवाय त्यांची मॉनिटरिंग व्यवस्थित होत आहे, अशी माहिती ठाणेदार पवार यांनी दिली. घरगुती हिंसा या विषयावर लताताई टिपले यांनी चर्चा केली. प्रवीण चिमूरकर यांनी शहरातील प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावे. सभोवताल घडणाऱ्या अनुचित घटनांची माहिती पोलीस विभागाला द्यावी. त्याविरुद्ध आवाज उठवावा. मानवी समाजाला मजबूत आणि सुरक्षित दिशेकडे नेण्यास मदत करावी, असे आवाहन केले.

ज्येष्ठ नागरिकांनी वेधले पोलिसांचे लक्ष

पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसोबत मैत्रीपूर्ण वागणूक मिळावी. रस्त्याच्या कडेला शहरात असलेल्या अनाथ, गतिमंद, वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात सोडावे. शहरातील तरुण मुले भरधाव वेगाने मोटारसायकल पळवतात. गाड्यांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करत गाड्या चालवतात. अशा मोटारसायकलचालकांवर कार्यवाही करावी, असे मुद्दे ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केले.

नागरिकांनी यापासून सावध राहावे - पोलीस

शहरातील सराफा लाइन येथे प्रत्येक दुकानदाराने दुकानाबाहेर रात्री लाइट सुरू ठेवावा. सध्या ज्या घटना घडत आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता सर्व पालकांनी स्वत: तरुण मुला-मुलींकडे लक्ष द्यावे. मोबाइलवर येणाऱ्या लॉटरी, बँक कॉल सावधानीपूर्वक हाताळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील सिंग पवार यांनी केले.

170821\1356-img-20210817-wa0007.jpg

फोटो

Web Title: Thanedar interacted with senior citizens on public issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.