जन्मादात्याचा पोटच्या पोरीवर अत्याचार, न्यायालयाने ठोठावला आजन्म कारावास

By परिमल डोहणे | Published: November 1, 2023 05:08 PM2023-11-01T17:08:01+5:302023-11-01T17:09:33+5:30

वर्षभर शोषण : आशा वर्करच्या सर्व्हेत फुटले बिंग

The birth father's abuse of the baby, the court sentenced him to life imprisonment | जन्मादात्याचा पोटच्या पोरीवर अत्याचार, न्यायालयाने ठोठावला आजन्म कारावास

जन्मादात्याचा पोटच्या पोरीवर अत्याचार, न्यायालयाने ठोठावला आजन्म कारावास

चंद्रपूर : जन्मदात्याने पोटच्या पोरीवर सलग वर्षभर अत्याचार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली; मात्र बिंग फुटताच तक्रार दाखल झाली. दरम्यान, प्रकरण न्यायालयात जाताच अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी नराधम बापाला बुधवारी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर तो नराधम पित्याची मुलीवरच वाईट नजर गेली. तेव्हापासून तो सलग मुलीवर अत्याचार करू लागला; मात्र पीडित मुलगी सर्व सहन करीत होती. दरम्यान, सन २०२१ मध्ये गावात सर्व्हे करीत असताना ही बाब आशा वर्करच्या लक्षात आली. त्यानंतर त्या आशा वर्करने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. या प्रकरणाचा तपास ‘पोस्को’ पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे येताच त्यांनी कसून तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल देताना अतिरिक्त सत्र न्यायधीश ए.व्ही.दीक्षित यांनी आरोपी पित्यास आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी अधिकारी म्हणून म्हणून स्वाती देशपांडे बाजू सांभाळली.

असे आले प्रकरण उघडकीस

पीडित मुलीवर वडील अत्याचार करीत असतानाही बदनामीपोटी तिने कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान, आशा वर्कर गावात सर्व्हे करीत असताना ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा तिला संशय आला. तिने तिला दवाखान्यात नेऊन तपासणी केली होती. तेव्हा ती गर्भवती असल्याचे समोर आले. तिला सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी भरती केले. त्यानंतर चंद्रपूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी आरोपीचे नाव सांगण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रकरण प्रलंबित होते. मात्र या प्रकरणाचा तपास ‘पोस्को’ पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे येताच त्यांनी त्या पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला विश्वासात घेऊन तिचे बयाण घेतले, तेव्हा तीने रडत रडत संपूर्ण आपभीती कथन केले. वडिलाचे नाव समोर येताच अटक करण्यात आली.

Web Title: The birth father's abuse of the baby, the court sentenced him to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.